आषाढी वारी 2024 ची जोरदार तयारी सर्व वारकरी भक्त मंडळी करत आहेत. पांडुरंगाच्या मंदिराला पुरातन सौंदर्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे, वारकरी भक्त उत्साहाने आपआपल्या दिंडीचे नियोजन करत आहेत. पावसाळ्याच्या हंगामात, भक्तीचा उत्साह आणि श्रद्धेचा झरा यांचा मिलाफ घडून येतो. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरकडे वाटचाल करण्यासाठी भाविकांची पावले उत्सुकतेने उचलली जातात.
आषाढी वारी मध्ये सहभागी होणे हा प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय आणि जीवन बदलणारा अनुभव असू शकतो. भक्ती, समाजसेवा आणि सांस्कृतिक अनुभव यांचा मिलाफ यात मिळतो. वारकऱ्यांच्या सोबत पंढरपूरला जात असताना आपल्याला आपल्या आध्यात्मिकतेचा शोध घेण्याची आणि जीवनाचा खरा अर्थ जाणून घेण्याची संधी मिळते.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी ही दिनांक 29 जून रोजी सायंकाळी 4 वाजता आळंदी येथून प्रस्थान होईल व सदगुरू श्री तुकाराम महाराज पालखी ही शनिवार दिनांक 29 जून रोजी इनामदार साहेब वाडा, देहू येथून प्रस्थान होईल. तसेच दिनांक 28 जून रोजी जगतगुरू श्री तुकाराम महाराज संस्थान तर्फे पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे.
आषाढी वारी 2024 चे सोपे वेळापत्रक आपण खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता:
तसेच पुणे पोलिस ह्यांच्याकरून एक वेबसाइट बनवण्यात आली आहे त्याचा वापर करून आपण पालखीला live ट्रॅक करू शकता. ह्यामुळे पालखी कोठे आली आहे हे आपल्याला आपल्या फोन वरून समजेल. आपण ह्या लिंक वर पालखीचे live लोकेशन पाहू शकता : लाईव ट्रॅक
काय असेल आषाढी वारी 2024 चा हवामान अंदाज :
आषाढी वारी 2024 पालखी प्रस्थान दरम्यान पुण्यात ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तरी, किमान तापमान हे 23° अंश व कमाल तापमान 29° अंश इतके असेल. सोर्स
वारकरी संप्रदाय विषयी अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा 👉 वारकरी