मनात नकारात्मक विचार येतात, काय करावे?: प्रेमानंद महाराज म्हणतात. Premanand Maharaj on Negative thoughts

प्रेमानंद महाराज: मन हे चंचल असते. आपण कसे वागतो, कोणाच्या संगतीत राहतो, कसे बोलतो यावरच आपल्या मनात अनेक चांगले किंवा वाईट विचार येत असतात. आपली मनस्थितीच आपले भविष्य ठरवते. जितके आपण आपल्या मनावर ताबा ठेवू/ मन स्थिर ठेवू, तितके सक्षम आपण बनत जातो.

Premanand Maharaj Photo
Premanand Maharaj

वृंदावनात राधाकृष्णाची भक्ती करणारे प्रेमानंद महाराज:

आज महाराज सोशल मिडीयावर आणि आध्यात्मिक क्षेत्रात चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांचे सत्संग आणि मार्गदर्शन लोकांना खूप प्रभावित करतात. सर्वांचे लोकप्रिय असणारे असे हे वृंदावन चे प्रेमानंद महाराज नकारात्मक विचारांवर काय म्हणतात ते आज पाहुयात.

नकारात्मक विचारांचे मूळ

मनात नेहमी नकारात्मक विचार येतात यावर महाराज म्हणतात की, हे तुमच्या सद्सतविवेकबुध्दीमुळे म्हणजेच तुमच्या विचारांमुळे घडते. तुम्ही काही गुप्त पाप केले आहे आणि त्याबद्दल शिक्षा झालेली नाही, अशा स्थितीत नकारात्मक विचार तुमच्या मनाला घेरतात. एखाघा व्यक्तीचे गुप्त पाप नकरात्मक विचारांच्या रुपाने त्याला आतून जाळून टाकतात.

प्रेमानंद महाराज: नकारात्मक विचारांवर उपाय

प्रेमानंद महाराज सांगतात की, नकारात्मक विचार दूर करण्यासाठी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण होय. नामस्मरणामुळे हळूहळू आपली बुद्धी शुद्ध होते. जर तुमच्या मनात नकारात्मक विचार आणि घाणेरडे शब्द आले तर तुम्ही नामस्मरण करुन तुम्ही तुमचे विचार सुधारु शकता. असे केल्याने नकारात्मक विचार संपुष्टात येतील.

नकारात्मक विचारांचा प्रभाव

एखाघा व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येतात ते दुस-या व्यक्तीला दुखावत नाहीत परंतु ते विचार आतून स्वत:ला दुखवतात. आनंद माणसाच्या विचारांमध्ये असतो आपले विचार शुद्ध करण्यासाठी नामजप सुरु करा. यामुळे सकारात्मक विचार येतील आणि मन प्रसन्न होईल.

नामस्मरणाचे महत्त्व

महाराज प्रवचनात सांगतात, नामस्मरण करत रहा म्हणजे सर्व गोष्टींचे ज्ञान आपोआप लक्षात येईल. भगवंताच विस्मरण होता कामा नये.

नकारात्मक सोच (Negative Thoughts) क्यों आते है और कैसे दूर करें ?
Premanand Maharaj on Negative Thoughts

हिंदू धर्माबद्दल आमचे इतर लेख 👉 हिंदू धर्म

Scroll to Top