कल्कि अवतार: काय आहे ‘कल्कि 2898 AD/Kalki 2898 AD’ मूवी चा अर्थ ?

Kalki 2898 AD, Meaning of 2898,

कल्कि अवतार: हिंदू धर्मात चार युगांची कल्पना आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग ही ती चार युगे. यापैकी कलियुग हे सध्या चालू असलेले युग आहे. लोकांमध्ये असा सर्वसाधारण समज आहे की, कलियुगात अधर्म, अन्याय आणि अत्याचार वाढेल. सध्याच्या परिस्थितीकडे पाहताना अनेकांना ही गोष्ट खरी वाटते. वाढती गुन्हेगारी, स्वार्थ, लोभ यांमुळे समाजात अशांतता निर्माण झाली आहे. अशापेक्षा परिस्थिती हाताबाहेर गेली तर? या प्रश्नाचा विचार केल्यावर हिंदू धर्मात वर्णन केलेले कल्की अवताराचे रहस्य आपल्यासमोर येते.

काय आहे कल्कि अवतार ?

पुराणांनुसार भगवान विष्णू पृथ्वीवर वेळोवेळी अवतार घेऊन धर्माची स्थापना करतात. कलियुगाच्या शेवटी जेव्हा अधर्माचा अतिरेक होईल, तेव्हा भगवान विष्णू कल्कि अवतारात जन्म घेतील, अशी मान्यता आहे. कल्किचा जन्म शंख, चक्र, गदा आणि कमळ या चार चिन्हांनी युक्त घोड्यावर होईल असे सांगितले जाते. कल्कि अवतार धर्मस्थापनेसाठी अधर्मी लोकांचा नाश करतील आणि सज्जनांचे रक्षण करतील, अशी श्रद्धा आहे.

कल्कि 2898 AD चित्रपट :

कल्कि 2898 AD हा 600 कोटींचे बजेट असणारा चित्रपट खूपच चर्चेत आहे. हिंदू धर्माला अनुसरून एक चांगला चित्रपट येत आहे, सत्य आणि पूर्णपणे संशोधन केलेला हा चित्रपट वाटत आहे. हा चित्रपट 27 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. नाग अश्विन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे व सी. अश्विनी दत्त यांनी ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी यांच्यासह कलाकारांचा भव्य कलाकारवर्ग आहे. संतोष नारायणन यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

2898 AD म्हणजे काय ?

या चित्रपटाच्या नावावरूनच समजते की या चित्रपटासाठी खूप संशोधन केले असेल. जेव्हा पासून ट्रेलर लाँच झाला, तेव्हापासून सर्वांच्या मनात एकाच प्रश्न फिरतोय की ‘कल्कि 2898 AD’ हे नाव का दिलं असेल? ‘2898 AD’ चा नेमका काय अर्थ आहे? तर जाणुन घेऊयात ‘2898 AD’ आहे तरी काय..

सर्वात आधी, AD आणि BC म्हणजे काय हे जाणून घेऊया : AD म्हणजे “Anno Domini,” हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ “आपल्या प्रभूच्या वर्षात” असा होतो. हे शब्द येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या वर्षांना दर्शवण्यासाठी वापरले जाते. उदाहरणार्थ, 2024 AD म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर 2024 वर्षे. BC म्हणजे “Before Christ.” हे शब्द येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीच्या वर्षांना दर्शवण्यासाठी वापरले जाते.

ह्या चित्रपटात महाभारतानंतर 6000 वर्षानंतर चे जग दाखवण्यात येणार आहे. म्हणजे आपण जर 2898 AD मधून 6000 वर्षे मागे गेलो तर आपल्याला 3102 BC हे वर्ष मिळते आणि हे तेच वर्ष आहे ज्या वर्षी महाभारत झाले होते आणि हा reference वातापी चे चालुक्य राजा पुलकेशी ‘द्वितीय’ यांच्या शिलालेखावरून वरून घेतला आहे. कारण ते जेव्हा राज्य करत होते तेव्हा महाभारताला 3735 साल पूर्ण झाले होते व तसेच शक राज्याला 556 साल पूर्ण झाले होते त्यामुळे जर आपण शक 556 ला Gregorian Calendar मध्ये बदलले तर आपल्याला 633/634 CE सापडते ज्यातुन आपण 3735 साल कमी केले तर आपल्याला महाभारताची तारीख 3102 BC वर्ष मिळते. आणि यात जर आपण 6000 वर्षे जोडली तर आपल्याला 2898 AD हे वर्ष मिळेल त्यामुळे या चित्रपटाचे नाव कल्कि 2898 AD असे दिले आहे. सोर्स

Kalki 2898 AD Trailer - Hindi | Prabhas | Amitabh Bachchan | Kamal Haasan | Deepika | Nag Ashwin
Kalki 2898 AD Trailer

हिंदू धर्माविषयी आमचे इतर लेख: 👉हिंदू धर्म

Scroll to Top